खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या वतीने खारघर येथे ममतादिन साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पनवेल उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील आणि जय महाकाली महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रणाली गुरूनाथ पाटील यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर ११ येथे सदर कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले होते.
यावेळी स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे यांना जय महाकाली महिला मंडळ खारघर तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जय महाकाली महिला मंडळ अध्यक्ष प्रणाली गुरूनाथ पाटील , उप.अध्यक्ष सुरेखा सोणार, अलका भोईर , चंद्रप्रभा सनस, शैलजा रासकर, मीना चौधरी , स्वाती खेडकर, सुषीला जगताप, आणि महिला मंडळाच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.
कोकण दर्पण.