Press "Enter" to skip to content

मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात ! सामाजिक एकता संस्थेच्या पुढाकाराने अस्वच्छता मोहीम !

तळोजा , कोकण दर्पण वृत्तसेवा : मोकळ्या भूखंडावरील घाणीमुळे तळोजावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा फेज १ मधील अनेक भूखंड मोकळे आहेत. त्या भूखंडावर पावसाळी गवत उगवले आहे. अद्यापि सिडको प्रशासनाने गवत कापलेले नाही. अशा मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढिगारे देखील साठले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सिडकोने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकळे भूखं स्वच्छ करावेत , त्यांना विकसित करावे , अशी मागणी रहिवाशांनी केली आहे .

दरम्यान ,तळाेजा फेज १ से. १० येथे ब-याच दीवसापासून प्लॉट नं ३९ व ४२ येथील नागरीकांची त्यांच्या शेजारी असणा-या रिकाम्या भुखंडावर असलेला घणकचरा व पावसाळ्यात उगवलेले गवत, झाडे झुडपे साफ व्हावी अशी मागणी होती. या सर्व घणकच-यामुळे डास व राेगराईचे प्रमाण वाढत हाेते.लहान मुले , महिला व नागरीक यांच्या या परीसरातील वावरण्याला भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजिक एकता संस्थेच्या माध्यमातून येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्लॉटची साफ-सफाई करण्यात आली. संस्थेने केलेल्या या कामाबद्दल या परीसरातील नागरीकांनी अध्यक्ष प्रसाद पाटील यांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने शहरातील रिकाम्या प्लॉटच्या स्वच्छतेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

यावेळी संस्थेचे कार्यकर्ते कुडलिक नेटके, नितीन पाटील,सचिन साेनावने, बालाजी इंगळे,तपन विश्वास, किरण पाटील उपस्थित होते.
कोकण दर्पण.