Press "Enter" to skip to content

प्राचार्य बी. ए. पाटील यांची राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड ! माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य बी. ए. पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पनवेल शहर मनपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्राचार्य बी ए पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे. रयत शिक्षण संस्थेने त्यांना कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित केले. आदर्श शिक्षक पुरस्कार , नवी मुंबई भूषण आदी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मागील १५ वर्षांपासून खारघर, पनवेल आणि नवी मुंबईत सामाजिक कार्यात वय सक्रिय आहेत. पर्यावरण , दारूबंदी ,सामाजिक एकात्मता , राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या आदी विषयांवर काम करीत आहेत. सामन्य जनतेचे कैवारी म्हणून प्राचार्य बी ए पाटील यांची ओळख आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा मनपा क्षेत्र प्रभाग समिती १ च्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम व नवीन पदनियुक्तीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य बी. ए. पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पनवेल शहर मनपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री कदम यांची प्रभाग १ च्या महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .तसेच महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक देखील करण्यात आल्या. प्रसाद पाटील यांची प्रभाग समितीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. प्रभाग १ चे उपाध्यक्ष म्हणून योगेश निपाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

कोकण दर्पण.