पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजप सरकारने २०१४ साली दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. विद्यमान सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात २०१९ निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री सुनील तटकरे यांनी खारघर येथे व्यक्त केला.
यावेळी तटकरे म्हणाले, २०१४ साली महागाई , बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या सारख्या मुद्द्यांचे भांडवल करून भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली. मात्र , सत्तेवर आल्यानंतर भाजपने जनतेची फसवणूक केली.उलट भाजपच्या राजवटीत महागाई आणखी वाढली, पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज पासूनच कामाला लागण्याचे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा प्रभाग समिती १ चे अध्यक्ष बळीराम नेटके यांच्या पुढाकाराने खारघर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात सुनील तटकरे बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील , पनवेल अध्यक्ष सतीश पाटील , माजी नगराध्यक्ष सुनील घरत, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे , नगरसेवक विजय खानावकर , रायगड जिल्हा महिला अध्यक्षा विध्या चव्हाण, अब्दुल्ला पटेल , प्रल्हाद गायकर , पनवेल तालुका ग्रामीणचे अध्यक्ष दर्शन ठाकूर अशोक जानोरकर , आनंद भंडारी , किशोर देवडेकर, डॉ राजेश देवीकर, विजय मयेकर , आत्माराम गायकर, सरवरकुमार जलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री कदम यांच्यासह सुमारे १२५ महिलांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री कदम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १२५ महिलांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तळोजा फेज १ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६५ महिला, पुरुष व युवकांनी प्रवेश केला.युवा नेतृत्व रोहन कदम यांच्या नेतृत्वाखाली शुभम उमाळे , अखिलेश पवार , प्रतीक जाधव , तुषार सस्ते , अनिता सोनुले , संगीता सुर्वे , सुनंदा कुंभार आदींनी प्रवेश केला. तळोजामधील सचिन सोनावले, चंद्रकांत पाटील , नंदा मोरे , शोभा शहा , आकाश कांबळे, कुंडलिक नेटके , अकबर बगदागी आदींनी प्रवेश केला.
यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंडलिक नेटके , शंकर सोनुले , प्रल्हाद गायकर, योगेश निपाने, विजय ऊप्पल, मकरंद पाटील, मनोहर सत्रे, इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष कष्ट घेतले. तसेच इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा प्रभाग समिती १ चे अध्यक्ष बळीराम नेटके यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांनी केले.
कोकण दर्पण.