खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथे गोवर-रुबेला लसीकरण शिबीर नुकतेच संपन्न झाले. पनवेल महानगर पालिकेच्या खारघर आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बिना जयेश गोगरी यांच्या विशेष पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातील खारघर आरोग्य केंद्राच्या माध्यमातून खारघर से.१९ येथे बीना गोगरींच्या सहकार्याने शासनाच्या गोवर-रूबेला निर्मूलन अभियाना अंतर्गत दि.४ जानेवारी २०१९ रोजी ९ महीने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमुलींसाठी मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित ह्या शिबिरात सभोवतालच्या १५० हून अधिक मुलांना ही लस देण्यात आली. या शिबीराला पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका अनिता पाटील. डब्ल्यू.एच.ओ. अधिकारी डॉ.जय हिमावत, संदीप देशमुख इत्यादी मानवऱ्यांनी भेट देऊन लस घेण्यासाठी आलेल्या मुलांची व पालकांची विचारपूस केली.
शासनाच्या महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बिना गोगरी आणि सामाजिक कार्यकर्ते जयेश गोगरी यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल पालक आणि रहिवाशानी कौतुक केले.
कोकण दर्पण .