नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई एमआयएमच्या वतीने पोलिसांना नववर्षाची आगळी-वेगळी भेट देण्यात आली. २०१९ नववर्षाचे स्वागत एमआयएमने पोलिसांसमवेत केले. एमआयएमचे नवी मुंबई नेता हरमीत सिंग गुप्ता यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
३१ डिसेम्बर रोजी रात्रीपासूनच नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असतात. एकूणच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिसांवरील जबाबदारी वाढते, त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत पोलीस आपल्या कुटुंबासमवेत करू शकत नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रभर तैनात असतात. त्यामुळे एमआयएम नवी मुंबईच्या वतीने आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.वाशी , सानपाडा , नेरुळ , सीबीडी , खारघर, पनवेल येथे रात्री सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना ब्लॅंकेट आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस रात्रभर सेवेत असतात त्यामुळे त्यांना एमआयएमच्या वतीने विशेष शुभेच्या देण्यात आल्या.यावेळी एमआयएमचे हरमीत सिंग गुप्ता, कल्पेश आवळे , विकी गायकवाड , इम्रान शेख , साजिद शेख , इस्माईल शेख , रतन श्रीयांन, संदीप मोरे , गुलरीं सिंग कंधारी , अकिब शेख तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एमआयएमचे रायगड – नवी मुंबई नेते शाहनवाज खान यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोकण दर्पण.