Press "Enter" to skip to content

वास्तुविहार धोकादायक ठरतंय ! स्लॅब कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर १६ मधील वास्तुविहार गृहसंकुल धोकादायक ठरतंय. घराचा स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.
घरकुल आणि स्पगेटी या गृहसंकुल प्रकल्पानंतर सिडकोने वास्तुविहार हा गृहप्रकल्प माध्यम व अल्पउत्पन्न गटासाठी बांधला. मात्र , घरकुल, स्पगेटी प्रमाणे येथे देखील दर्जेदार बांधकाम न झाल्याने रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते , गटारे , मलनिस्सारण वाहिन्यांच्या समस्यांनी नागरिक हैराण आहेतच त्यामध्ये घराचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडू लागल्याने रहिवाशी धास्तावले आहेत. वास्तुविहार के एच २ मधील इमारत क्रमांक १२ तिसऱ्या माळ्यावरील जिन्याचा स्लॅब कोसळला. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. सिडको प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इमारतीची तपासणी करावी, अशी मागणी भाजपा रायगड जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम यांनी कोकण दर्पणशी बोलताना केली.

कोकण दर्पण .