नवी मुंबई / पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई , पनवेल आणि खारघर येथील विविध सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने दादर मुंबई येथील चैत्यभूमीवर जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खारघर येथील रेड कार्पेट ट्रस्टच्या वतीने खारघर सेक्टर ७ येथे सायण – पनवेल महामार्गावरून चैत्यभूमीकडे जाणाऱ्यांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम गायकवाड ,सचिव भीमराव गायकवाड , खजिनदार सोनाली यादव ,संचालक स्वप्नाली सोनावणे , नितेश सोनावणे आणि लता गायकवाड यांनी भोजनदानाची व्यवस्था केली आहे.
पनवेल हायवेवर खारघर स्पॅगेटी बसस्थानकाजवळ सकाळी ९ : ३० वाजल्यापासून भीमकन्या यशोदा गायकवाड यांनी चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी फळ वाटपाची व्यवस्था केली आहे.नवी मुंबईचे नेते खाजामिया पटेल यांनी देखील भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कोकण दर्पण.