Press "Enter" to skip to content

खारघर टोल नाक्यावर भाजपचा रास्ता रोको ! सुमारे एक तास रोखला महामार्ग ! स्थानिक प्रकल्पग्रस्त टोल कर्मचाऱ्यांना नोकरीवरून तडकाफडकी काढल्याने केले आंदोलन !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर टोल नाक्यावर काम करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना लाडकाफडकी कामावरून काढल्याने खारघर मधील भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास सायन पनवेल महामार्गत रोखला होता. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शेवटी खारघर पोलिसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक वाहतूक सुरळीत केली .

सभापती अभिमन्यू पाटील, सभापती निलेश बाविस्कर, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक प्रविण पाटील, नगरसेवक शत्रूघ काकडे, कीर्ती नवघरे , हरीचंद्र ठाकूर, मधुकर ठाकूर, विष्णू ठाकूर, विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. खारघर टोल नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या २५ ते ३० कामगारांना अचानक कोणतंही कारण न देता तडकाफडकी कामावरुन कमी करण्यात आलं. खारघर टोलनाका प्रशासनाने कमी केलेले २५ ते ३० कर्मचारी हे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून कामावरून कमी केल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे. शिवाय खारघर टोल नाका इथे दीर्घ कालावधीची सेवा करूनही त्यांना अचानकपणे कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी खारघर भाजपकडे साकडे घातले. त्यानुसार खारघर टोल व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार आणि हुकूमशाही याचा तीव्र निषेध खारघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर टोल प्रशासनासोबत चर्चा करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर खारघर टोल प्रशासनाने कोणतीही दाखल घेतली नाही. त्यांनतर आज खारघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खारघर टोल नाका इथे जवळपास तासाभराचा रास्ता रोको केला. यावेळी खारघर टोल नाका प्रशासन हाय हाय,प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी खारघर टोल नाका दणाणून गेला होता. या आंदोलनात जवळपास १५० ते २०० प्रकल्पग्रस्त कामगारांनी देखील सहभाग घेतला. यावेळी खारघर टोल नाका परीसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत खारघर भाजप च्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन इथली वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.

कोकण दर्पण.