पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी पनवेल तालूक्यातील खारघर येथील शाश्वत फाऊंडेशन आणि भारत रक्षा मंच या सामाजिक संस्था सामाजिक योगदानासाठी पुढे सरसावल्या आहेत. या संस्थांच्या वतीने पनवेल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये अन्नदाण्याचे वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील बानुबाई वाडी ,भोकर वाडी, हाडंबा वाडी, बामण डुंगी ,लहुची वाडी, आखाडा वाडी, विठ्ठल वाडी, खैराट वाडी, कोरळ वाडी , सारसई धनगर वाडी, धनगरवाडी , टपोरा वाडी, गोविंद वाडी, आपटा येथील नागरिकांना ५ किलो तांदूळ, १ किलो तूरदाळ, १ किलो तेल,१ किलो मिठ, १ किलो कांदा, १ किलो बटाटा, ५० ग्रॅम तिखट मसाला याप्रमाणे शिधावाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पनवेल पोलिस ठाण्यात त्यांच्या गरजेनुसार ५० मास्क देण्यात आले.
शासनाकडून माहिती घेऊन आवश्यकतेनुसार सहाय्य्यता मोहीम सुरु राखण्याचा मनोदय अध्यक्षा बिना गोगरी आणि कार्याध्यक्ष जयेश गोगरी यांनी व्यक्त केला. शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बीना गोगरी, स्मिता आचार्य, दिनेश रावरीया, जयेश गोगरी, विपुल अग्रवाल,भारत रक्षा मंच चे संगठन मंत्री प्रशांत कोतवाल,सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांच्या सहकार्याने हे कार्य झाले.
खारघर येथील के.पी.सी. इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका छाया रमणीक छेडा व शाळेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी शाश्वत फाऊंडेशनच्या या उपक्रमाला विशेष सहकार्य दिले. त्याचप्रमाणे खारघर सेक्टर १९ मधील गिरीराज कृष्ण या सोसायटीच्या रहिवाशांनी देखील योगदान दिले.

कोकण दर्पण





