Press "Enter" to skip to content

कोरोनो विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी घरी रहा , सुरक्षित रहा : नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे घरकुलवासीयांना आवाहन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोनो विषाणूचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. आपला देश आणि राज्य मोठ्या शिताफीने कोरोनोशी लढत आहेत. पनवेल महानगरपालिका प्रशासन कोरोनोला रोखण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण जनता म्हणून आपले कर्तव्य महत्वाचे आहे. कोरोनो विरोधात आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. त्यामुळे घरी राहून आपण पनवेल महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, घरी राहून देशाला या संकटातुन बाहेर काढण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन , पनवेल महापालिकेतील खारघर प्रभाग सहाचे स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी खारघरवासियांना केले आहे. खारघरमधील मास हौसिंग सोसायटी असलेल्या घरकुल आणि वास्तुविहार कॉलनीमधील रहिवाशांनी विशेष काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन निलेश बाविस्कर यांनी केले आहे.

कोरोनोच्या पार्शवभूमीवर पनवेलकर धास्तावले आहेत. कोरोनोचा दुसरा रुग्ण हा पनवेल महापालिका क्षेत्रात सापडला आहे. त्यामुळे खारघर आणि पनवेलकरांची चिंता वाढली आहे. घरकुल ही फार मोठी कॉलनी आहे. सुमारे दीड हजार सदनिका आहेत. घरकुल ही मध्यम वर्गीय लोकांची सोसायटी आहे. इथे लोकांचा मोठ्या प्रमाणात संचार असतो. घरकुल कॉलनीचे चारही गेट खुले असतात. त्यामुळे बाहेरील संसर्ग होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. हीच परिस्थिती वास्तुविहार सोसायटीची आहे. स्पगेटी आणि सेलिब्रेशन देखील मोठ्या सोसायट्या आहेत.इथे लोकांचा सहज वावर जास्त प्रमाणात असतो. पनवेल महापालिका क्षेत्रातील घरकुल आणि वास्तुविहार सारख्या मास हौसिंगमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण नसल्याने कोरोनोचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ०६, खारघर येथील घरकुल गृहसंकुल ,सेक्टर १५ या परिसरातील रहिवाशीला वाशी येथील फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे मेडिकल रिपोर्ट कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे. आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व आमचे खारघरचे सर्व नगरसेवक यांचे व्यक्तिगत लक्ष आहे व त्यांच्या कुटुंबाबरोबर संपर्कात आहे. भारतीय जनता पार्टी व पनवेल महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून संपूर्ण मदत त्यांच्या कुटुंबाला करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या सर्व नागरिकांना घरी थांबण्याचे भावनिक आवाहन निलेश बाविस्कर यांनी केले आहे. आपण सर्वांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे. घाबरून जाऊ नका सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्याच साठी कार्यरत आहे, असा दिलासा बाविस्कर यांनी रहिवाशांनी दिला.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »