वारंवार मागणी करून देखील
प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगर पालिकेकडे वारंवार मागणी करून देखील पालिका प्रशासन धूर फवारणी आणि निर्जंतुकीकरण करण्यास विलंब लावत असल्याची ओरड सध्या तळोजा फेज 1 मधील नागरिक करीत आहेत. महापालिका आयुक्त डॉ गणेश देशमुख यांच्याकडे देखील थेट तक्रार करून प्रशासन तळोजा बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी केला आहे.
कोरोनो संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील महरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिका प्रशासनाद्वारे सध्या महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे. तळोजा फेज 1 मध्ये देखील करावे अशी मागणी येथील रहिवाशी अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन याबाबत अध्यापि दखल घेत नसल्याचे प्रसाद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पालिका प्रशासनाने तळोजा फेज 1 मध्ये तातडीने निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी येथील नागतिकानी केली आहे.
कोकण दर्पण.





