नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : १६ व्या डी वाय पाटील टी २० चषक २०२० ची सुरुवात सोमवारी झाली. या स्पर्धेचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा तथा डॉ डी वाय पाटील क्रीडा समूहाचे अध्यक्ष डॉ विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेत एकूण ३१ सामन्यांचे आयोजन केले असून दररोज चार सामने खेळले जाणार आहेत. ४ व ५ मार्च रोजी उपांत्यपूर्व सामने खेळले जाणार असून ६ मार्च रोजी उपांत्य आणि अंतिम सामने खेळले जाणार असल्याची माहिती डॉ विजय पाटील यांनी सोमवारी नेरुळ येथील स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई , नेरुळ येथील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेत २४० खेळाडूंचा सहभाग होणार असून प्रामुख्याने शिखर धवन , हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमार , मनीष पांडे , अनमोलप्रीत सिंग , श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव , संजू सॅमसन , शिवम ठुबे , दिव्यांश सक्सेना, दिनेश कार्तिक , मंदीप सिंग, आदित्य तरे, सिद्धेश लाड असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू सहभागीहोणार आहेत.
सदर स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांना मोफत प्रेवेश ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत डी वाय पाटील ए, स्पर्धेत डी वाय पाटील बी , मुंबई कस्टम, आरबीआय , वेस्टर्न रेल्वे , सेंट्रल रेल्वे , एअर इंडिया , बीपीसीएल , इनकम टॅक्स , रिलायन्स १, जैन इरिगेशन, इंडियन ऑइल, इंडियन नेव्ही , सीएजी, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आदी क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. ६ मार्च रोजी अंतिम सामना प्रकाश झोतात खेळला जाणार आहे.

१६ व्या डी वाय पाटील टी २० चषकची सुरुवात ! शिखर धवन , हार्दिक पांड्यासह अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




