Press "Enter" to skip to content

२० व्या सत्याग्रह महोत्सवाचे सिडको अर्बनहट् सी.बी.डी. येथे आयोजन !

२० व्या सत्याग्रह महोत्सवाचे सिडको अर्बनहट् सी.बी.डी. येथे आयोजन !:

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सत्याग्रह महाविद्यालयाच्यावतीने शिक्षण संस्थेतील विध्यार्थ्यांच्या कला, संगीत, नृत्य गुणाला वाव देणे आणि त्यांच्यामधील कौशल्य सादरीकरणासाठी गेली १९ वर्षांपासून सिडको अर्बन हट्,सी.बी.डी. – बेलापूर, नवी मुंबई येथे सत्याग्रह महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी देखील २० व्या सत्याग्रह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १० , ११ आणि १२ फेबु्रवारी रोजी सांय. ५ ते रात्री ९ वेळात संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पु. भं. डाॅ. उपगुप्त महाथेरो यांच्याहस्ते होणार आहे.
हा महोत्सव नवी मुंबईतील नागरिकांना मनोरंजनाची आणि नव्या-नव्या सामाजिक विषयावर शिक्षण , प्रषिक्षण देणारी मेजवाणीच आहे. या महाविद्यालयातील हाॅस्पीटॅलिटी आणि पर्यटन विभागाच्यावतीने महाराष्ट्र फुड चाखण्याची संधी उपस्थितांना उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयातील विशेष खादय पदार्थ या मेळाव्याला उपस्थित राहणार्यांना निमंत्रितांना खायला मिळणार आहेत. असे संस्थेचे संचालक डाॅ. जी.के. डोंगरगांवकर यांनी जाहिर पत्रकाद्वारे कळविले आहे.
भवतु सब्बं मंगल ! यांवर आधारित कला, नाटय, नृत्य, संगीतमय कौशल्याचे सादरीकरण राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिध्दार्थ मल्टिपरपज् रेसिडेन्षल् हायस्कूल, अंजिठा इंटरनॅशनल स्कूल, डाॅ. नेल्सन मंडेला निवासी आश्रम शाळा , डाॅ. जी.के. डोंगरगांवकरइंटरनॅशनल स्कूल, सत्याग्रह महाविद्यालय, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय विद्यार्थी करणार आहेत असे मेळाव्याचे निमत्रंक सुजाता भोसले म्हणाल्या.
संस्थेतील प्राविण्यप्राप्त आणि विविध स्पर्धा, संशोधन , खेळ, साहित्य अविष्कारमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या कर्तबगार विद्यार्थ्यांचा गौरव प्राचार्य डाॅ. पु.भदंत खेमधम्मो महास्तवीर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या मुकनायक पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्ताने पत्रकारितेद्वारे भारतीय समाजाची पुर्नरचना, परिवर्तन आणि समान संधी आणि दर्जेपासून वंचित राहिलेल्या दुर्बल घटकांसाठी पत्रकार म्हणून विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या १० पत्रकारांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भिमराव आंबेडकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे.
सत्याग्रह महोत्सव एमएमआरडीए परिक्षेत्रातील सर्व नागरिकांना निशुल्क आणि खुला आहे. संस्थेतील विद्याथ्र्यांच्या आजी-आजोबांना स्नेहभोजन यानिमित्ताने संस्थेच्यावतीने देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील विशेष खाद्य पदार्थ – हैद्राबादी बिर्याणी, कोकणी मासे आणि भाकरी, वांगे भरीत बाजरीची भाकर, नागपुरची संत्री मिठाई, कोल्हापूरचे मिसळ, पुण्याची पुरण पोळीचा आस्वाद घेण्याची संधी उपस्थित नागरिकांना मिळणार आहे. यासाठी या महाविद्यालयातील हाॅटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत, सत्याग्रह महोत्सवाला नवी मुंबई आणि रायगडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्राचार्य डाॅ. जी.के. डोंगरगांवकर यांनी केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »