संविधान संस्कार केंद्र सत्याग्रह कॉलेज !
संजय महाडिक
शिक्षण म्हणजे मानवी जीवन जगण्यासाठी दिशा देणारे मार्गदर्शन अथवा प्रशिक्षण हवे. अर्थात मानवी मूल्यांची जपणूक करणारे संस्कार अशा शिक्षणातून मिळायला हवेत. विध्यार्थ्यांना हे शिक्षण भारतीय संविधानातून मिळते, कारण समता , स्वातंत्र्यता , बंधुता आणि न्यायाच्या सिद्धांतावर संविधानाचा पाया रचला आहे. म्हणूनच भारतीय लोकशाही प्रगल्भ आणि सर्वश्रेष्ठ आहे. संविधानिक मूल्यांचे सूत्र धरून संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि रक्षण करून लोकशाहीचा मनोरा सर्वोच्च उंचीवर नेऊन मानवी न्याय-हक्काचे संस्कार देण्याचे कार्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर शहरात असलेले सत्याग्रह कॉलेज करीत आहे. जात , धर्म , पंथ , वंश आणि वर्ण भेदाच्या पलीकडे जाऊन देशामध्ये समतामूलक मानवी समाज निर्माण करणारी पिढी आम्हाला घडवायची आहे, माणुसकी हाच त्यांचा धर्म असेल आणि आपला देश हेच त्यांचे सर्वस्व असेल , असे सत्याग्रह कॉलेजचे चेअरमन डॉ. जी. के. डोंगरगावकर बोलताना म्हणाले.
भारतीय लोकशाही आणि संविधानाचा सातत्याने जागर करणारे रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्य आणि देशातील सत्याग्रह कॉलेज हे एकमेव शिक्षण केंद्र आहे , असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. भारतीय प्रजासत्ताक दिन असो किव्हा भारतीय स्वातंत्र्य दिन असो किंव्हा संविधान दिन असो, राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात सत्याग्रह कॉलेज आग्रही असते. शिक्षणाबरोबर विध्यार्थ्याला देशाच्या लोकशाही आणि न्यायप्रणालीची माहिती असायला हवी, तरच तो विध्यार्थी उद्याचा सक्षम आणि जबाबदार नागरिक बनेल. म्हणून संविधान आणि त्यातील कायदे याबाबत सत्याग्रह कॉलेजमध्ये प्रशिक्षण दिले जाते. सत्याने आणि सातत्याने भारतीय संविधानाचे ग्रंथ वाटप हे तर सत्याग्रह कॉलेजचे लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन करण्याचे मोठे कार्य म्हणावे लागेल. विधार्थ्यांसह सर्व समाजामध्ये देखील हा विचार रुजविणायचे कार्य सातत्याने सत्याग्रह कॉलेज करीत आहे.
खरतर हि विचारांची रुजवण संस्थेच्या वैचारिक बांधणीवर अवलंबून आहे. सत्याग्रह कॉलेजची वैचारिक बांधणी लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारी आहे. सतयागह कॉलेजचे चेअरमन डॉ जी के डोंगरगावकर यांनी या विचारांची पेरणी केली आहे. असे म्हणतात ना चांगलं पेरले तर चांगलेच उगवते. मागील अनेक वर्षांपासून त्याची प्रचिती येथे येते.
सामाजिक न्यायहककचे अनेक संगर रायगड जिल्यात झाले आहेत. रायगड आणि कोकण हि छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीने पावन झालेली भूमी होय. रायगडातील अनेक मानवी संगराच्या स्मृती जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ जी के डोंगरगावकर यांनी खारघर येथे सत्याग्रह या नावाने कॉलेज सुरु केले. राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कॉलेजसह केजी टू पीजी हे शैक्षणिक उपक्रम सुरु आहेत. ११ वी , १२ वी कला , वाणिज्य , विज्ञान शाखेतून येथे शिक्षण दिले जाते. बीए , बीकॉम ,बीएससी -आयटी , बीएससी-कॉम्प्युटर सायन्स , बीएमएस ,बीएमएम , बीएड असे अनेक प्रशिक्षण कोर्स येथे उपलब्ध आहेत. दर्जेदार शिक्षणाचे सर्वाना सम्यक शिक्षण देणारे हे संस्कार केंद्र आहे.
संजय महाडिक





