Press "Enter" to skip to content

रायगड पालकमंत्री पदाबाबत पुनर्विचार करण्याची शिवसेनेची मागणी !

रायगड पालकमंत्री पदाबाबत पुनर्विचार करण्याची शिवसेनेची मागणी !

पनवेल,कोकण दर्पण : शिवसेनेचे तीन-तीन आमदार असताना फक्त एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला रायगडचे पालकमंत्री पद गेल्याने रायगड जिल्ह्यातील शिवनेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अद्यापि धुसफूस सुरु आहे. रायगडचे पालकमंत्री पद बदलाबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी शिवनेने केली आहे. ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे महाविकास आघाडीचे सूत्र होते, असा धागा धरून शिवसेनेने हि मागणी धरून ठेवली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला रायगडचे पालकमंत्री पद जाणे हेच न्यायिक होते, हेच महाविकास आघाडीच्या भल्यासाठी पोषक असल्याचे सूचक वक्तव्य खासदार बारणे यांनी केले.
दरम्यान , रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी देखील आक्रमक भुमीका मांडली आहे. जो पर्यंत शिवसेनेला पालकमंत्री पद मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही , असे स्पष्ट केले. याबाबत पुन्हा शिवसेनेचे आमदार , पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »