खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या महिलेने मनात भीती बाळगू नये , आपण आपले संरक्षण केले पाहिजे, यासाठी आपले आत्मबळ वाढविले पाहिजे, संकट समोर आलेच तर त्याला दोन हात केले पाहिजेत, असा रोखटोक सल्ला शाश्वत फौंडेशनच्या अध्यक्षा बीना जयेश गोगरी यांनी खारघर मधील महिलांना दिला. अंधेरेसे नही डरेंगे असा संकल्प केला.
अंधारावर चालून जाणार रातरागिनी या कार्यक्रमानिमित्ताने बीना गोगरी यांच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते ग्रामविकास भवन खारघर दरम्यान नाईट वॉक काढण्यात आला. महिलांचे आत्मबळ वाढविणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कोकण दर्पण.





