Press "Enter" to skip to content

नवी मुंबई महापालिकेचा निर्णय ! प्रकल्पग्रस्तांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत ! नगरसेवक सुनील पाटील यांच्या प्रस्तावाला महासभेत शिक्कामोर्तब !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजुरी मिळाली. नगरसेवक सुनील पाटील यांनी सदर मागणी केली होती.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील ५०० स्क्वेअर फूट घरांना मालमत्ताकरात सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यापार्शवभूमीवर नवी मुबई महापालिका क्षेत्रातील ५०१ ते ७०० स्क्वेअर फूट घरांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणला होता. मात्र सदर प्रस्तावाचा नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना फायदा होणार नाही. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांची घरे हि मोठ्या क्षेत्राची असल्याने महापालिकेच्या सदर प्रस्तावाचा फायदा त्यांना होणार नसल्याचे नगरसेवक सुनील पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले व प्रकल्पग्रस्तांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. सदर मागणीला महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली.

कोकण दर्पण.