Press "Enter" to skip to content

वीरेंद्र लगाडे यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते वीरेंद्र लगाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. वीरेंद्र लगाडे हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
एक सामाजिक नेता ते एक सक्रिय राजकारणी असा वीरेंद्र लंगडे यांचा प्रवास आहे. नेरुळ नवी मुंबई येथे कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले, आणि सामाजिक कार्याची त्यांची परंपरा कायम सुरु ठेवली आहे. आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो , मोठे झालो त्या समाजाचे आपण देणेकरी लागतो हि भावना त्यांनी सदैव जपली आहे. म्हणूनच विभागातील कोणत्याही कुटुंबावर अडचण आली तर रात्री अपरात्री मदतीसाठी धावून जाणारे वीरेंद्र लगाडे यांचे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमातून वीरेंद्र लगाडे यांनी सामाजिक एकात्मता सदैव जपली. सामाजिक एकोपा राखण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला.
अनेक वर्षे ते राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत. ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी समाजातील तळागाळातील जनतेच्या न्यायहक्कची , वंचितांच्या न्यायहक्कची संपूर्ण महाराष्ट्रात न्यायहक्काचे आनॊदळण उभारले आहे. या क्रांती लढ्यात , सामाजिक न्यायहक्काच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्धार वीरेंद्र लगाडे यांनी केला आहे. वंचितांच्या न्याय-हक्कासाठी आपण कायम लढत राहणार , अशी प्रतिक्रिया वीरेंद्र लगाडे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »