दापोली, कोकण दर्पण वृत्तसेवा (मंगेश गमरे ) : दापोली तालुक्यातील मौजे पाचवली येथील साळवी परिवाराच्या जाग्रृत कुळदैवत श्री काळभैरव,आई भवानी व योगेश्वरी मातेची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रविवार दिं.२४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रूवारी रोजी सकाळी ९ वाजल्या पासुन १२.३० पर्यंत ब्राम्हणांच्या मंत्रघोषात विधीवत संपन्न होणार आहे.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास भाविकानी ऊपस्थित राहून देवाची आरती,देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अग्रही निमंत्रण नरेंद्र साळवी, अजित साळवी, श्याम आत्माराम साळवी , मोहन साळवी , विलास साळवी , हेमंत साळवी , चंद्रशेखर साळवी , सुबोध साळवी , जितू साळवी , विजय साळवी , भाऊ शांताराम साळवी , अविराज साळवी , मंदार साळवी यांनी समस्थ साळवी परिवाराच्या वतीने केले आहे.
कोकण दर्पण.





