Press "Enter" to skip to content

८५ महिलांचा भाजपात प्रवेश ! नगरसेवक निलेश बाविस्कर यांचा पुढाकार !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथे वास्तव्य करणाऱ्या विविध राज्यातील ८५ महिलांनी भाजपात प्रवेश केला. खारघर प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने सदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खारघर सेक्टर १५ येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमाला पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभापती विद्या गायकवाड , भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, रायडग जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष कीर्ती नवघरे, नगरसेविका आरती नवघरे , नगरसेवक नरेश ठाकूर , सरचिटणीस गीता चौधरी, महिला सरचिटणीस मोना अडवाणी ,तालुका महिला सरचिटणीस कुंदा मेंगड़े आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण.