Press "Enter" to skip to content

नवी मुंबई येथे मोफत वधू-वर महामेळाव्याचे आयोजन ! हरमीत सिंग गुप्ता यांचे विशेष योगदान !

वंचित बहुजन आघाडी एमआयएम नवी मुंबईचे नेते हरमीत सिंग गुप्ता यांच्या विशेष योगदानातून आणि मंगल मैत्री मॅरेज फोरम यांच्या विद्यमाने नेरुळ येथे मोफत वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ७ या वेळात नेरुळ सेक्टर ३ येथील समाज मंदिर हॉल मध्ये सदर वधू-वर महामेळावा संपन्न होणार आहे.
मेळाव्याच्या दिवशी दुपारी २ ते ३ वाजे पर्यंत प्रत्यक्षात वधू-वर नोंदणी केली जाणार आहे. वधू-वर यांच्या सोबत पालक नसतील किव्हा पालकांसोबत वधुवर नसतील तर या मेळाव्या सहभाग घेता येणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
सदर वधू-वर महामेळावा संपूर्ण महाराष्ट्रातील वधू वरांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त वधूवरांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक हरमीत सिंग गुप्ता आणि मंगल मैत्री मॅरेज फोरमचे अध्यक्ष अमित पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९८९२५८१५४५ या क्रमांकावर साधावा.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »