Press "Enter" to skip to content

नवी मुंबईतील पत्रकारांच्या घरांसाठी सिडको घेणार पुढाकार – सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिवंगारे यांचे आश्वासन !

नवी मुबंई, कोकण दर्पण वृत्तसेवा (मुकेश शिंदे ) : सिडको हद्दीतील घरांसाठी स्थानिक पञकारांचा लढा सुरूच आहे घरांसाठी पञकांरांना दि जी पी आर पीच्या घातलेल्या जाचक अटी पञकारांसाठी डोकेदुखी ठरत असतांना स्थानिक पञकारांना या घरांपासुन कोणत्याही प्रकारे वंचित न राहण्याबाबत सिडकोने सकारात्मक पाऊल उचलण्याचे ठरविले असुन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिवंगारे यांच्याकडे स्थानिक पञकारांनी दिलेल्या निवेदना नंतर याबाबत संचालक मंडळाशी संवाद साधुन यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
सिडको एम .डी .लोकेश चंद्र, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या दालणात पञकारांच्या घरांचा हा विषय चचेँसाठी असतांनाच शिवांगरे यांनी दिलेल्या आश्वासनांने पञकारांना हक्काचे घर मिळण्याचा विश्वास मिळाला.

कोकण दर्पण.