Press "Enter" to skip to content

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने १७, १८, १९ फेब्रुवारी रोजी खारघर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन ! मराठा समाज खारघरचा पुढाकार !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा (जान्हवी साल्पेकर ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मराठा समाज खारघर या सामाजिक संस्थेच्या वतीने १७, १८, १९ फेब्रुवारी रोजी खारघर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत खारघर सेक्टर १२ येथील उत्कर्ष हॉल मध्ये कुटुंब फाउंडेशन सातारा व नवी मुंबई ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्रातून आज काय शिकावे ? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शिवप्रबोधनकार सोमनाथ गोडसे हे या विषयावर बोलणार आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान सर्व समाजातील खारघरवासी महिलांसाठी विविध खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले आहे . मराठा समाज महिला मंडळाने या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे. १९ फेब्रुवारी रोजी युवा विचार मंचच्या वतीने मोटर सायकन रॅली काढण्यात येणार आहे तर दुपारी ३ वाजता महिनांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे. सातारा मित्र मंडळ आणि शंभूराजे मित्र मंडळद्वारे रायगड किल्ल्यावरून निघालेली शिवज्योत सायंकाळी ५ वाजता खारघर येथे प्रस्थान केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव हा खारघरवासियांचा उत्सव आहे , त्यामुळे खारघर मधील सर्व जाती-धर्मातील समाज समूहाने तिन्हीही दिवस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य बी ए पतील यांनी केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »