Press "Enter" to skip to content

डाॅ. नेल्सन मंडेला आश्रमशाळेने आमच्या व्यक्तिमत्वाला सम्यक आकार दिला – मधुकर ढेबे !

नागोठणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : नागोठणे येथील डाॅ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेने या शाळेच्या त्रिदशकपुर्ती निमित्त रायगड महोत्सवाचे आयोजन करून आजी-माजी विदयाथ्र्यांचे स्नेहसंम्मेलन नुकतेच पार पाडले. या महोत्सवात रायगड जिल्हयातील 126 गावातील विदयार्थी उपस्थित होते. नागोठणे – रोहा रोडवरील नव्याने खरेदी करण्यात आलेल्या संस्थेच्या मालकीच्या वांगणी येथील जागेत हा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाचे अध्यक्ष तथा संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी कोंकण प्रदेशातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते व्ही.के. जाधव होते. रायगड महोत्साचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅजी.के. डोंगरगांवकर यांनी महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पार्पण आणि दिप प्रज्वलन करून केले असे निमंत्रण समितीचे प्रमुख प्रकाश जानकर यांनी सांगितले.

त्रिदशकपुर्ती निमित्त या शाळेत शिकुन जीवनाच्या विविध क्षेत्रात विशेष रूपाने कार्यरत असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील संतोष आखाडे, मधुकर ढेबे, लक्ष्मण ढेबे, अनंत हिरवे, धाऊ केंडे, मंगेश कोकळे, कृष्णा कोकळे, जाई गोरे, गुलाब जानकर, झिमा कोकाटे, अशोक जानकर या माजी विदयाथ्र्याचा भारताचे संविधान, भगवान बुध्द आणि त्याचा धम्म, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून संस्थेचे अध्यक्ष प्रा. डाॅ.जी. के. डोंगरागांवकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डाॅ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा ही रायगड जिल्हयातील विमुक्त भटक्या जाती-जमातीच्या विदयाथ्र्यांसाठींची एकमेव शाळा असुन गेली 30 वर्षापासून या शाळेने डोंगर दऱ्यातील शिक्षणाची कोणतीही सुविधा नसलेल्या आणि प्रतिकुल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या विमुक्त भटक्या जाती जमातीच्या १ ली ते १० वी पर्यंतच्या विदयाथ्र्यांना शिक्षणाची संधी दिली. निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, भोजन, भांडी, आंथरूण-पांघरूण, साबण साहित्याबरोबरच दर्जेदार शिक्षण या शाळेतुन मिळाले. जीवनात यशस्वी जगण्याचे केवळ शिक्षण नाही तर संस्कार देवून आम्हां विदयाथ्र्यांच्या व्यक्तिमत्वाला संविधानिक आकार दिला. आमच्यामध्ये विज्ञानवाद रूजण्याचे संस्कार केले. दुजाभाव विरहीत जगण्याचे आणि अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याचे शिक्षण या शाळेतुन मिळाले असे गौरवोद्गार या शाळेचे माजी विदयार्थी मधुकर ढेबे यांनी या कार्यक्रमात या महोत्सवात व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, सरकार केवळ मासिक रू. 930/- असे तुटपुंजे विदयार्थी मानधन देत असतांना संस्था आपल्या स्वयंनिधीतून दर्जेदार शिक्षणाबरोबरच पोटभर योग्य आहार आणि आईसारखी माया देणारे शिक्षक या शाळेत आहेत असे ते म्हणाले.

या शिक्षण संस्थेने रायगड जिल्हयाबरोबरच महाराष्ट्रातील ११ जिल्हयातील विदयाथ्र्यांना शिकण्याची संधी दिली. सरकारने आखुन दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी सर्व जाती धर्माचे या शाळेत प्रवेशित करून एकोप्याने एकत्रित शिकवण्याची संधी संस्थेने स्वतःच्या खर्चान केली. त्यामुळे ही संस्था एक माॅडेल आश्रमशाळा म्हणून उल्लेख करणे योग्य ठरेल असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.के. जाधव म्हणाले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मुख्याध्यापिका, सुजाता भोसले, एम. एल. सुर्यवंशी, अमरचंद हाडोळतीकर व प्रमुख पाहुणे म्हणून न्यु इंडिया एश्युरन्स कंपनीच्या विभागीय मॅनेजर रत्नमाला डोंगरगांवकर उपस्थित होत्या. रायगड महोत्सवात रायगडच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणरे सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद महोत्सवात उपस्थित असलेल्या पालक, नागरिकांनी घेतला असे या शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगांवकर यांनी सांगितले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गेली एक महिना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »