Press "Enter" to skip to content

उलवे मॅरेथॉन ! एक धाव पाणी बचतीसाठी ! १० फेब्रुवारी रोजी उलवे धावणार ! रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

उरण , कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमीचे उपाध्यक्ष, साई संस्थान वहाळचे संस्थापक – अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ उलवेचे अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १० फेब्रुवारी रोजी उलवे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी हे जीवन आहे, हा अनमोल संदेश देण्यासाठी पाणी बचतीबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी `एक धाव पाणी बचतीसाठी` अशी संकल्पना घेत उलवे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
किमान २० हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून या ऑनलाईन प्रणालीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आणि रवीशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची मॅरेथॉनचे लाईव्हच्या माध्यमातून राज्यभरात दर्शक आनंद घेऊ शकतील असे आयोजनही करण्यात आले आहे. सिडको कडून या मॅरेथॉन आयोजनात भरीव सहकार्य लाभले असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. यावेळी मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या खुल्या गटासाठी १० किमी तर महिलांच्या खुल्या गटासाठी ८ किमीचे उद्दिष्ट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, ३१ ते ५० वर्षे वयोगटातील हौशी स्पर्धक, फॅन्सी ड्रेसची ड्रीम रन, पोलीस बांधवांसाठी ५ किमीची ड्रीम रन अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स मुळे हि मॅरेथॉन लक्षवेधी ठरणार आहे.

अध्यात्माच्या माध्यमातून ईश्वरसेवा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसेवा, यांचे अप्रतिम संतुलन साधणारे व्यक्तिमत्व म्हणजे रवीशेठ पाटील होय. माजी आमदार विवेक पाटील यांच्या कार्याने प्रेरित होऊन साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक सेवा, समाजसेवा, अध्यात्म या सगळ्याच कार्यात हिरीरीने अग्रस्थानी असणाऱ्या रवीशेठ पाटील यांचा रविवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी महिलांच्या जिल्हा स्तरीय कबड्डी आणि कुस्ती च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर वाढदिवसाच्या पूर्व संध्येला रायगड सुंदरी स्पर्धा संपन्न होणार आहे. केअर फॉर नेचर आणि रोटरी क्लब ऑफ सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा संपन्न होणार आहेत. १० तारखेच्या कार्यक्रमांना सकाळी ६ वाजल्यापासून मॅरेथॉन ने सुरुवात होणार आहे. त्यानंतर वेश्वी येथे जिल्ह्या स्तरीय खो खो आणि कराटे च्या स्पर्धा संपन्न होतील. दुपारी २ ते ५ दरम्यात साई मंदिर वहाळ येथे कर्करोगाने ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता तरघर येथे रवीशेठ पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आर के ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश झोतात खेळली जाणारी क्रिकेटची हि स्पर्धा पुढील चार दिवस चालणार आहे.
राजू मुंबईकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने वेश्वी येथील स्व शंकरशेठ मुंबईकर स्टेडियम वर “पर्व नव्या युगाचे” हि नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. रवीशेठ पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राजकीय तसेच कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत भाई पाटील, मा आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नागराध्य्क्ष जे एम म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, शेकाप चे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, आमदार धैर्यशील पाटील, आमदार पंडित शेठ पाटील, आमदार सुरेश लाड, संदीप नाईक, कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील आदींसह सिने नाट्य क्षेत्रातून सुप्रसिद्ध सेट्स डिझयनार नितीन देसाई, मकरंद अनासपुरे, विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडेकर, सुशांत शेलार, भूषण कडू, विकास समुद्रे, जॉनी रावत उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील मांदियाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. यामध्ये मुख्य म्हणजे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, अशोक शिनगारे, नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोषी, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पाठारे, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी एस एम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एकूणच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा या तीनही पातळ्यांवर कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »