Press "Enter" to skip to content

गुरुनाथ गोमा म्हात्रे यांची भाजपा खारघर शहर सोशल मीडिया सेल अध्यक्षपदी निवड !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपचे सक्रिय कार्यकर्ते ,रामभक्त गुरुनाथ गोमा म्हात्रे  यांची भाजपा खारघर शहर सोशल मिडिया अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
गुरुनाथ म्हात्रे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे निकटवर्तीय आहेत. पक्षवाढीसाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. बेलपाडा आणि सेक्टर 3 व 4 मध्ये ते विविध सामाजिक कार्यक्रम मागील अनेक वर्षपासून राबवित आहेत. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आदी सार्वजनिक कार्यक्रमातून गुरुनाथ म्हात्रे सामाजिक एकता निर्माण करीत आहेत.

भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुनाथ गोमा म्हात्रे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. यावेळी महापौर कविता चौतमल, सभाग्रह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »