मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : पु. अहिल्याबाई होळकर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण गावडे यांना विठोजी होळकर क्रांतीरत्न सामाजिक व वैद्यकीय पुरस्कार राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते व विश्वविक्रमी आमदार गणपतराव देशमुख उपस्थित होते.
माणदेश नगरी म्हसवड जि. सातारा येथे दि. १८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान पार पडलेल्या तीन दिवशीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभ प्रसंगी हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी धनगर साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
दरम्यान पु. अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोशिएशनच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या ठाणे महापालिका रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अरुण गावडे यांना विठोजी होळकर क्रांतीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, धनगर समाजातील युवकांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत वैद्यकीय सेवा घडविली आहे. याच तालुक्यातील मार्डी गावचे सुपुत्र केशव काळे व डॉ. विठ्ठल काळे बंधूंनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याचा उल्लेख यावेळी केला.
याप्रसंगी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, साहित्य संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले, स्वागताध्यक्ष बाळासाहेब कर्णवर, डॉ. केशव काळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. वर्षा चौरे, डॉ. अमोल शिंगाडे, डॉ. बाबासाहेब दोलताडे आदिंसह साहित्यरसिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजकार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या डॉ. वर्षा चौरे यांचाही आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोकण दर्पण.





