Press "Enter" to skip to content

कामोठे येथील गोवारी विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न ! संविधानामुळे देश प्रजासत्ताक झाला – सूरदास गोवारी यांचे प्रतिपादन !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : कामोठे येथील दामाजी गणपत गोवारी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७० वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर विविध कार्यक्रम सादर केले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण केले. २६ जानेवारी १९५० पासून देशात प्रजासत्ताक राज्य सुरु झाले. संविधानामुळे भारत देश प्रजासत्ताक झाला. भारतीय संविधान हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सूरदासदादा गोवारी यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन सूरदासदादा गोवारी, जेष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, प्रभारी प्राचार्या स्नेहल पाटील , सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव गायकवाड , संस्थेचे पदाधिकारी , पालक व विध्यर्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »