Press "Enter" to skip to content

खारघर येथे मा सरस्वती पूजनोत्सव ! आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर , नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन ! समाजसेवक राजेश श्रीवास्तव यांचा पुढाकार !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश श्रीवास्तव यांच्या पुढाकाराने आणि सेवा फाउंडेशनच्या वतीने खारघर येथे मा सरस्वती पूजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर सेक्टर ७ येथील उत्सव चौक मैदानात १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती सेवा फाऊंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष राजेश श्रीवास्तव यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
मा सरस्वती पूजनोत्सवानिमित्ताने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमिताने ४ वाजून ३० मिनिटांनी मोफत आरोग्य शिबीर व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आहे आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान हेच श्रेष्ठदान याबाबत जनजागृती निर्माण करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत आरोग्य शिबीर फोर्टीज हॉस्पिटलच्या सहकार्याने होणार असून नेत्रचिकित्सा करण्यासाठी खारघर आय क्लीनिकची टीम येणार आहे. रक्तदान शिबिरात रक्तसंकलनासाठी नवी मुंबई ब्लड बँकची टीम येणार असल्याचे आयोजक राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले.

सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन आयडॉल फेम अनन्या मुखर्जी , रोहित राज सिन्हा , श्वेता, नेपाळची लता मंगेशकर म्हणून ओळखली जाणारी गायक सुनीती अधिकारी ,मिसेस नवी मुंबई, मिसेस इंडिया किरण राजपूत , बॉलिवूड व भोजपुरी अभिनेता सुदीप पांड्ये , जेष्ठ अभिनेता अंजन श्रीवास्तव , दीपक सिन्हा आदी कलावंत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. रात्री महाप्रसादानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल.तमाम खारघरवासियांनी मा सरस्वती पूजनोत्सवात सहभागी व्हावे , विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटावा , तसेच अधिक माहितीसाठी ९१६७७३१६१५ या क्रमांकावर संपर्क करावा ,असे आवाहन राजेश श्रीवास्तव यांनी केले आहे.

 

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »