Press "Enter" to skip to content

विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कुलमध्ये भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते हे ध्वजारोहणकरण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर नृत्याविष्कार विदयार्थ्यांनी सादर केला. यावेळी वातावरण देशभक्तमय झाले होते. त्याचबरोबर पर्यावरण संवधर्नाच्या दृष्टीकोनातून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश यावेळी देण्यात आला. त्याचबरोबर विदयार्थ्यांनी उर्त्कृष्ट संचलन करीत ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »