Press "Enter" to skip to content

प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमध्ये मोफत पासपोर्ट फोटो कार्यक्रम ! अजित अडसुळे, उषा अडसुळे यांचा उपक्रम ! २० जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महागरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमध्ये नागरिकांना मोफत पासपोर्ट फोटो भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि खारघर ग्रामपंचायत माजी सदस्य उषा अडसुळे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २० जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. खारघर सेक्टर १५ येथील गुडविल सोसायटीत शॉप क्रमांक १६ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार विवेक पाटील आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे , माजी सभापती काशिनाथ पाटील प्रमुख पाहीन म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अजित अडसुळे आणि उषा अडसुळे यांनी केले आहे.

कोकण दर्पण.