
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आरोग्य आणि तंदुरुस्तीची समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही संकल्पना घेऊन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये १३ जानेवारी झालेल्या ११ व्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेत मुंबईच्या योगेंद्र कुमारने तर महिलांच्या खुल्या गटात पुण्याच्या जनाबाई हिरवे यांनी प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली. सुविधांची चोख सेवा, उत्कृष्ट व सुनियोजनात झालेल्या या मॅरॅथॉनमध्ये १६ हजारहून अधिक म्हणजेच अपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन तुफान प्रतिसाद देत ही खारघर महामॅरेथॉन केली.
विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी स्पर्धेची वाहवा करतानाच आम्ही खारघर मॅरेथॉनच्या प्रेमात पडलो आहोत अशी पावतीही दिली. यावेळी सर्वाना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. विविध गटातील स्पर्धा पार पडत असतानाच हावरे विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ‘हम भी किसिसे कम नही’ हे दाखवून देत स्पर्धकांमध्ये चैतन्य पसरविले. त्यांना उपस्थित क्रीडारसिकांनी दाद देऊन त्यांचे कौतुक केले तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कारही केला. तसेच विविध सामाजिक संदेश घेऊन खारघर मधील सोसायट्या या स्पर्धेत धावल्या. यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन १० कि.मी.ची स्पर्धा पू्र्ण करत फिटनेस मंत्र दिला. त्याचबरोबर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सतत मेहनत घेणारे स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, मिस्टर युनिव्हर्स जगजेता शरीरोष्ठवपटू संग्राम चौगुले, सिने अभिनेत्री मोनालिसा बागल, एफएम आरजे अर्चना, आरजे सलील, मिसेस इंडिया अर्थ किरण राजपूत, यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पॅराडाईज ग्रुपचे मनीष भतीजा, महापालिकेचे सभागृह नेते आणि मॅरेथॉनचे प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ सभापती अभिमन्यू पाटील, रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्या राज अलोनी, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष रोटरी इंटरनॅशनलचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘निर्भय भारतासाठी’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सदभावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’ ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’ अशी घोषवाक्य घेवून यशस्वीरित्या उत्कॄष्ठ आयोजनाने पार पडल्या आहेत. या स्पर्धांमध्ये ०१ लाखपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. सामाजिक व शारिरीक हित जोपासले जात उत्कृष्ठ व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. धकाधकीच्या या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. वैद्यकीय सल्ल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देण्यापेक्षा वेळच्यावेळी व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास निरोगी राहता येऊ शकते. ब्लडप्रेशर, मधुमेह असे आजार झाल्यानंतरच शक्यता व्यायामाकडे वळले जाते, मात्र हा उपाय नंतर करण्यापेक्षा सुरुवातीपासून व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे, त्यामुळे यंदा ‘हम फिट तो इंडिया फिट’ या शिर्षकाखाली हि ११ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा २४ समित्या कार्यरत होत्या.
या स्पर्धेत स्पर्धकांच्या सेवेसाठी स्पर्धेचे प्रारंभ ठिकाण असलेल्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये ‘झुंबा डान्स’ चे स्टेज, पिण्याच्या पाण्याचे बुथ, प्रथोमपचार केंद्र, बक्षिस वितरण, स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक देण्याची व्यवस्था, त्याचबरोबर स्पर्धेच्या मार्गात फिडींग पॉईंट, स्पंजिंग पॉईंट, प्रथोमपचार केंद्रे या व्यवस्थाही उभारण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ‘सिडको महामंडळ व पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच रेडिओच्या माध्यमातून स्पर्धेच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी ‘९१. १ एफएम रेडिओ सिटी’ने, स्पर्धेचे डिजिटल पार्टनर ‘इनसाईन टेक्नोलोंजी, मिडिया पार्टनर ‘श्री जी ऍडव्हर्टाइझिंग’, सिनेमा पार्टनर ‘कार्निवल सिनेमा’, फिटनेस पार्टनर ‘फिजिक जीम’, तसेच स्पर्धेच्या काळात स्पर्धकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी ‘अपोलो हॉस्पिटल’, येरला हॉस्पिटल’ व ‘मदरहूड केअर’ हे तत्पर होते. स्पर्धकांना रिफ्रेशमेंटची जबादारी आयएनआयएफडी(INIFD), बायोट्रेक रिसर्च व डायनोस्टिक सेंटर, व एस टेनिस अकॅडेमी यांनी घेतली होती तर उत्तेजनवर्धक गोळ्या ‘सिप्ला लिमिटेड’ व उत्तेजनवर्धक पेय ‘रेड बुल’ कडून देण्यात आल्या, त्याचबरोबरीने स्पर्धेमध्ये ‘व्हिनस’ कंपनीकडून प्रदूषणविरोधी मास्क देण्यात आले होते आणि या स्पर्धेतील स्पर्धकांना पायलटिंग करण्याची जबाबदारी ‘पॅन थंडर्स मोटरसायकल कलब’ यांनी पार पाडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. त्यांच्यामुळे देशाची मान जगात सन्मानाने उभी आहे. जगात लोकसंख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धुराच्या मुक्तीसाठी व सर्वसामान्य कुटूंबासाठी २ कोटी जणांना उज्वला योजना, ८ कोटी शौचालय उभारण्याबरोबरच १० कोटी लोकांना प्रधानमंत्री आरोग्य योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. देशाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला पण तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस संदर्भात दिलेला चॅलेंज पूर्ण करण्याबरोबरच स्वच्छतेसंदर्भातही दक्ष रहावे.
-सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर
कोकण दर्पण .





