
नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट यांच्या वतीने अभिव्यक्ती स्वतंत्र आणि आजचे वर्तमान या विषयावर वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने पनवेल येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर याना अभिवादन करण्यात आले. खारघर शहर पत्रकार संघाच्या वतीने देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर याना अभिवादन करण्यात आले. पत्रकार दिनानिममते खारघर मधील पत्रकारांचा खारघर वाहतूक पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला. मराठी पत्रकार दिनानीमित्त पत्रकाराना खारघर वाहतुक शाखेचे प्रवीण पांडे व भाजपचे शहर चीटणिस दीपक शिंदे(सर) शुभेच्छा यांनी खारघर शहर पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गजानन चव्हाण , सचिव हर्षल भदाणे , खजिनदार वैभव गायकर, उपाध्यक्ष मुकेश शिंदे उपस्थित होते.
एमआयएमचे नेते शाहनवाज खान यांनी देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन केले.
कोकण दर्पण.





